मुंबई – ‘थप्पड से डर नाही लगता सहाब…’ असे म्हणत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री ‘सोनाक्षी सिन्हा’चा आज वाढदिवस आहे. सोनाक्षी सिन्हाचा आज वाढदिवस.
2 जून 1987 रोजी बिहारच्या पटना शहरात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या घरी तिचा जन्म झाला. शत्रुघ्न सिन्हा यांची सोनाक्षी धाकटी मुलगी आहे. सोनाक्षीसह शत्रुघ्न यांना दोन जुळी मुले असून लव आणि कुश ही त्यांची नावे आहेत.
सोनाक्षीनं 2010 मध्ये आलेल्या दबंग चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं असून, आज तिला जवळपास 10 वर्ष झाली आहेत. दबंग चित्रपटात अभिनेता ‘सलमान खान’ मुख्य भूमिकेत दिसून आला होता.
सोनाक्षीने एक छोटासा तारा आपल्या गळ्याच्या खालच्या बाजूला गोंदवून घेतला आहे. हा आपल्यासाठी मार्गदर्शक तारा असल्याचे सोनाक्षीचे म्हणणे आहे.