नवी दिल्ली – आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक जिंकून देणारा माजी बाॅक्सिंगपटू डिंको सिंह याला कोरोनाची लागण झाली आहे. अर्जुन आणि पद्म पुरस्कार प्राप्त इंफाल येथील 41 वर्षीय डिंको सिंह हा लिव्हर कॅन्सरने सुध्दा त्रस्त आहे. काही दिवसापूर्वीच त्याला उपचारासाठी इंफाल येथून दिल्ली येथे आणण्यात आले होते.
Asian Games gold medal-winning former boxer Dingko Singh has tested positive for COVID-19: source
— Press Trust of India (@PTI_News) May 31, 2020
मणिपूरच्या या बाॅक्सिंगपटूने 1988 मध्ये बॅकांक मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत भारतासाठी सुवर्णपदक पटकाविले होते. रिपोर्टनुसार त्याला कॅन्सरच्या उपचारासाठी एक महिन्यापूर्वी एयर अॅम्बुलन्सव्दारे दिल्लीत आणले होते, दरम्यान उपचारानंतर त्याला काविळ झाली आणि तो मणिपूर येथे परतला होता.
माहितीनुसार, दिल्लीतील उपचारानंतर त्याला जेव्हा अॅम्बुलन्सव्दारे 2400 किमी प्रवास करून मणिपूर येथे आणण्यात आले त्यादरम्यान कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.