नगर -संगमनेर तालुक्यातील निमोण येथील दोन महिलांना करोनाची लागण झाली आहे. 19 मे रोजी निमोण येथील एक व्यक्ती नाशिक येथे बाधित आढळून आली होती. त्याची आई आणि पत्नी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्या नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता 74 झाली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली.
दरम्यान अकोले तालुक्यातील लिंगदेव येथील एका व्यक्तीचा अहवाल खाजगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला होता. या व्यक्तीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची येथील करोना टेस्ट लॅब मध्ये पुन्हा स्त्राव तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.