पुणे – जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीत आतापर्यंत 55 बाधित रुग्ण आढळून आले असून 30 जणांना घरी सोडण्यात आले असून एकाचा मृत्यू झाला असून 24 जणांवर उपचार सुरू आहेत.दरम्यान, यात सर्वांत आघाडीवर दौंड नगपरिषद हद्द असून त्यात तब्बल 46 रुग्ण आढळून आले आहेत.
दौंड नगर परिषद हद्दीत आढललेल्या रुग्णांमध्ये राज्य राखीव पोलीस दलातील 42 जवान तर शहरातील 4 नागरिक आहेत. तर 15 जवांनांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, हे जवान करोना पॉझेटिव्ह आढळले असून ते दौंडमध्ये बाधित झाले नसून ते ज्या ठिकाणी सेवा बाजावित होते त्याठिकाणी बाधित झाले आहे.
याव्यतिरिक्त बारामती नगरपरिषद हद्दीतील 7 पैकी एकाचा मृत्यू झाला असून 6 जणांनी करोनावर मात करीत घरी परतले आहेत. तर जेजुरीतील श्री मार्तंड देवसंस्थानच्या भक्तनिवासातील डायलिसिस सेंटरमधील एक लॅब टेक्निशियनचा खासगी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.
मात्र, शासकीय अहवाल निगेटिव्ह आल्याने जेजुरी करोनामुक्तच होती.मात्र, सुरुवातीला पॉझिटिव्ह अहवाल आल्याने जेजुरी नगरपरिषदेचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. तर वडगाव मावळमध्ये एक रुग्ण आढळून आला आहे.