कोपरगाव -कोपरगाव तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था झाल्यामुळे दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून आमदार निधीतून रस्त्यांच्या कामांसाठी निधी मंजूर केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कोपरगावचे रस्ते विकसित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे. आ. काळे यांच्या स्थानिक विकास निधीतून कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ते एंडकी नाला व या रस्त्यासाठी 15 लाख, कोळपेवाडी ते कोळगाव थडी या रस्त्यासाठी 20 लाख रुपये मंजूर झाले आहेत.
या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन सोशल डिस्टन्स राखून आ. काळे यांच्या हस्ते करण्यात आले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने रस्ते दुरुस्तीला प्राधान्य दिले असून, तालुक्यातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी टप्याटप्याने निधी मिळविण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न सुरू आहेत. सध्या करोना संकटामुळे विकासकामांना निधी मिळण्यात अडचणी येत आहेत. तरीही कोपरगाव तालुक्यातील विकासाची अडलेली गाडी पुन्हा रुळावर आणायची आहे. करोनाच्या संकटाशी दोन हात सुरु असून, या संकटाचा विकासकामांवर कोणताही परिणाम होणार नाही, अशी ग्वाही आ. काळे यांनी दिली.
यावेळी आनंदराव चव्हाण, जयंत रोहमारे, रोहिदास होन, केशव जावळे, शंकरराव चव्हाण, डॉ. गोरक्षनाथ रोकडे, बाळासाहेब खरात, सुधाकर होन, विलास चव्हाण, दगूभाऊ होन, नारायण होन, दादासाहेब होन, कोळपेवाडीचे सरपंच सूर्यभान कोळपे, कोळगाव थडीच्या सरपंच संगीताताई विलास निंबाळकर, कोळपेवाडीचे उपसरपंच डॉ. प्रकाश कोळपे, कोळगाव थडीचे उपस्थित होते.