जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिका सरकारने त्यांच्या देशातील हिंदू, मुस्लीम समुदायांना पारंपरिक पद्धतीनुसार विवाह करण्यास कायदेशीर अनुमती दिली आहे. त्या देशात सध्या हिंदू, मुस्लीम यांना पारंपरिक पद्धतीने केलेल्या विवाहांना कायदेशीर अनुमती नाही. त्या देशातील हा विवाह कायदा 1961 चा आहे. त्यात आता बदल करून हिंदू, मुस्लीम या धर्मीयांनाही दिलासा देण्यात आला आहे. आजपर्यंत केवळ ख्रिश्चन धर्मातील विवाहांनाच तेथे कायदेशीर मान्यता होती.
त्यामुळे हिंदू व मुस्लिमांमध्ये काही कायदेशीर अडचणी निर्माण होत होत्या. इस्लामिक कायद्यांमध्ये मुस्लीम महिलांना दुसरा विवाह करण्यास अनुमती आहे पण दक्षिण आफ्रिकेतील विद्यमान कायद्यांमध्ये अशा विवाहांना अनुमती नव्हती. दुसऱ्या विवाहातून जन्मलेली मुले तेथे अनौरस संतती ठरत होती. दक्षिण आफ्रिकेच्या गृहविभागाने यातील अडचणी आणि घटनात्मक तरतुदी यांचे एक सादरीकरण संसदेपुढे करून संसदेला या धर्मीयांच्या विवाहांना कायदेशीर अनुमती देण्याची गरज पटवून दिली.