सांगली(प्रतिनिधी)- जिल्ह्यातील शिराळा व खानापूर तालुक्यातील प्रत्येकी एक अशा दोघांचे करोना रिपोर्ट मंगळवारी रात्री उशिरा पाँझिटिव्ह आले.रेड (ता. शिराळा) येथे मुंबईहून दि. १७ मे रोजी ४२ वर्षीय महिला आली होती. या महिलेला होम क्वारंटाइन करण्यात आले होते.
लक्षणे दिसू लागल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काल मिरज आयसोलेशन कक्षाकडे संदर्भित केले होते. या महिलेचा आज करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच बलवडी ता. खानापूर येथे दिनांक १५ मे रोजी दिल्लीहून ५५ वर्षीय पुरुष आला होता. या व्यक्तीला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. लक्षणे उद्भवल्याने त्यांना काल मिरज आयसोलेशन कक्षात संदर्भित करण्यात आले होते.
या व्यक्तीचा कोरोणा चाचणी अहवालही पॉझिटिव्ह आला आहे . या दोन्ही कोरोना बाधितांच्या निकटवर्तीयांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू असून अनुषांगिक उपाय योजना करण्यात येत आहेत.