पुणे- पुण्यातील अनेक भागात अनेक व्यवसाय सुरु करण्यात आले आहेत. त्यात सोने आणि अन्य काही व्यवसायांचा समावेश आहे. पथारी व्यवसायालासुद्धा परवानगी देण्यात आली आहे. मात्र काही भागात पथारी व्यावसाय सुरु ठेवण्यावर बंदी केली आहे.
या परिसरात पथारी व्यवसायावर बंदी-
– शिवाजी रस्ता-पुणे मनपा-डेंगळे पूल-शनिवार वाडा ते जेधे चौक मार्गावर पथारी व्यावसायिकांना बंदी.
– बाजीराव रोड-पुरम चौक-माडिवाले कॉलनी-शनिवार चौक-विश्रामबागवाडा-शनिवारवाडा.
– हडपसर-सोलापूर रोड – मगरपट्टा चौक ते गाडीतळ, गाडीतळ ते लक्ष्मी कॉलनी चौक ते शेवाळवाडी टोलनाका ते पुणे शहर हद्दीपर्यंत तसेच गाडीतळ ते फुरसंगी सासवड रस्त्याने पुणे शहर हद्दीपर्यंत.
– सातारा रस्ता-जेधे चौक-लक्ष्मीनारायण थिएटर, सिटी प्राइड, विवेकानंद पुतळा, धनकवडी उड्डाणपूल ते कात्रज चौक, कात्रज चौक ते सातारा रस्त्याने पुणे शहर हद्दीपर्यंत.
– नगर रस्ता – येरवडा पर्णकुटी, गुंजन चौक, विमाननगर, वडगावशेरी, खराडी बायपास चौक ते वाघोली, तैलाची मोरी पुणे शहर हद्दीपर्यंत.
– विमानतळ रस्ता-गुंजन चौक-गोल्फ क्लब रोड-येरवडा पोस्ट ऑफिस-नागपूर चाळ-जेलरोड पोलीस चौकी-संजय पार्क- एअरपोर्ट.
– सिंहगड रोड-दांडेकर पूल-पानमळा-रोहन-कृतिका लगत, नाकोडा नगर-राजाराम पूल-विठ्ठलवाडी फुटपाथ-संतोष हॉल- आनंदनगर, माणिकबाग-वडगाव धायरी उड्डाणपूल, धायरी फाटा-धायरी शेवटचा बसस्टॉप.
– पौड रोड- खंडोजी बाबा चौक – स्वातंत्र्य चौक-नळ स्टॉप- कर्वेरस्ता उड्डाणपूल-आनंदनगर-शास्त्री नगर-कोथरुड बस डेपो-चांदणी चौक.
– जंगली महाराज रस्ता-संचेती चौक-झाशीची राणी चौक-डेक्कन जिमखाना-छत्रपती संभाजी पुतळा-खंडोजी बाबा चौक.
– फर्गुसन महाविद्यालय रस्ता (एफ.सी. रोड) – खंडोजी बाबा चौक-गुडलक चौक – वैशाली हॉटेल-फर्गसन कॉलेज-संत ज्ञानेश्वर पादुका चौक-शिवाजीनगर पोलीस स्टेशन.
– गणेशखिंड रोड-शिमला ऑफिस चौक-म्हसोबा चौक-सेंट्रल मॉल-शासकीय तंत्रनिकेतन-विद्यापीठ चौक-राजभवन-इंदिरा गांधी झोपडपट्टी-राजीव गांधी पूल-औंध- पुणे शहर हद्दपर्यंत.