नवी दिल्ली : श्रीनगरमधील नवाकदल परिसरात काल रात्री भारतीय सैन्य दलात आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या चकमकीत किती दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैनिकांना यश आले, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परिसरात भारतीय सैन्यदलाच्या वतीने सर्च ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. त्यानंतर श्रीनगरमधील मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
Jammu and Kashmir: An encounter broke out between terrorists and security forces in Nawakadal area of Srinagar on the intervening night of 18-19 May. Mobile internet services have been snapped in Srinagar. More details awaited. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/Sg9DEO7t8C
— ANI (@ANI) May 19, 2020
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यातील एका गावात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये भारतीय सैन्य दलाचा एक जवान शहीद झाला होता. सैन्य दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवानांना डोडा जिल्ह्यातील एका गावात दहशतवादी असल्याची माहिती मिळताच, त्यांनी डोडा शहरापासून 26 किलोमीटर अंतरावर गुंडाना परिसरात असलेल्या पोस्ता-पोत्रा गावात एक सर्च ऑपरेशन चालवले. त्यांनी सांगितले होते की, लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली होती.
ज्यामध्ये सैन्यदलातील एक जवान गंभीर जखमी झाला असून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याआधीच तो शहीद झाला होता. पुढे बोलताना अधिकारी म्हणाले की, सेना राष्ट्रीय रायफल्स, पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त दलाने एका घरात संशयित दहशतवादी असल्याची माहिती मिळताच हे सर्च ऑपरेशन चालवले होते .