मुंबई – दैनंदिन जीवनात आपल्या बरोबर कधी कोटी घटना घडेल हे सांगणे जरा अवघडच आहे. दरम्यान, अशीच एक विचित्र घटना बॉलिवूड अभिनेत्री ‘सना मकबूल’ हिच्या बरोबर घडली आहे. दाक्षिणात्य सिनेमा आणि टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या सनासोबत नुकताच एक अपघात झाला आहे. तिच्या तोंडावर कुत्र्यानं चावा घेतल्यानं तिच्या चेहऱ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.
सना मकबूलनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या आयुष्यातला हा कठीण प्रसंग सर्वांशी शेअर केला आहे. सध्या संपूर्ण जग कोरोनासारख्या संकटाशी लढत असताना ही अभिनेत्री तिच्या आयुष्यात सर्वात कठीण काळाचा सामना करत आहे.
तिने आपल्या पोस्ट मध्ये लिहलं कि, “मी स्वतःला प्रसंगातून सावरत असले तरी मला आता जीवनाची भीती वाटू लागली आहे. आता माझ्या आयुष्यात पूर्वीसारखं काहीच राहिलं नाही. आता ते कधीच पूर्वीसारखं होऊ शकणार नाही असं म्हटलं आहे”. सनाची ही भावूक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.