सोलापूर- जिल्ह्यात आज 13 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 343 वर पोहचली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
तसेच आतापर्यंत जिल्ह्यात या आजारानं 24 जणांचा बळी घेतला असून 113 रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं सोलापूरकरांची चिंता आणखीच वाढली आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडायचं असल्यासं मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आलाय.