नागपूर : वाढदिवस म्हणजे मौज मस्ती, छान छान कपडे, पदार्थ, मित्र मैत्रिणी यांची चंगळ. मात्र चिमुकल्या सांज संजय सोमकुंवर हिने 10 व्या वाढदिवसाच्या दिवशी मोठ्यानांही लाजवेल असा निर्णय घेऊन आपला वाढदिवस अत्यंत साधेपणाने साजरा केला. तिने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष कोवीड-19 करीता दहा हजार रुपयांचा धनादेश आणि पिगी बँक पालकमंत्री डॉ.नितीन राऊत आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला.
दरम्यान, आतापर्यंत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २८० कोटी रुपये जमा झाले आहेत. समाजाप्रतीच्या दायित्व भावनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रक्कम जमा करणाऱ्या दात्यांचे मदतीचे हात अनमोल आहेत. या संकटकाळात बालकांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे.