सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील ८ संशयितांचे करोना रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तर ३ नव्या संशयितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
येथील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असणाऱ्या ८ करोना संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून ३ नागरिकांना करोना संशयित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली..