पुणे : शहरात करोनाच्या साथीला अटकाव घालण्यासाठी शासकीय स्तरावर वेगवेगळया उपाय योजना सुरू आहेत. त्यासाठी शहरातील शासकीय रूग्णालयांमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा उभारल्या जात आहेत. रूग्णालयांच्या सुविधांसाठी आवश्यक असलेल्या निधीची गरज लक्षात घेऊन पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांनी लष्कर भागातील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयास 50 लाख रुपये ICU तसेच इतर साधन सामग्री खरेदी करण्यासाठी निधी देण्यात आला आहे.
सध्या पुणे शहरातील पूर्व भागातील कॅम्प तसेच मध्यवस्ती मध्ये ,झोपड्यांमध्ये कोरोणा चा संसर्ग वाढत आहे .त्यामुळे आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी आमदार कांबळे यांनी पाठपुरावा चालू केला आहे. त्याचबरोबर ससून रुग्णालयातील नवीन इमारत कोरोना रूग्णालय सुरू करण्यासाठीही शासकीत पातळीवर त्यांचा पाठपुरावा सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शासनाच्या आरोग्य विभागात याबाबत समन्वंय असून लवकरच हे कोवीड 19 रूग्णालय सुरू केले जाणर असल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले. तसेच मतदारसंघातील झोपडपट्टी ,कामगार ,मजूर ,ज्यांचे हातावर पोट आहे अशा गरजू आणि वंचित समाजाला आमदार सुनील कांबळे यांच्याकडून पाच किलो गहू ,तांदूळ , डाळ आणि तेल घरपोच दिले जात असून आता पर्यंत तब्बल 5 हजारहून अधिक गरजूंना मदत देण्यात आली असून हे काम सुरूच ठेवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.