औंध: दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीमाजी नगरसेवक प्रमोद निम्हण,स्वराज्य प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ व नागरिक पाषाण-सुतारवाडी-सोमेश्वरवाडी-पंचवटी यांच्या वतीने परिसरातील दुकानदारांना विनंतीपत्र देण्यात आले. व त्यांना विनंती करण्यात आले की दुपारनंतर सर्व दुकाने बंद ठेवून पूर्णतः लॉकडाऊन पाळण्यात यावा.
पुण्यातील दिवसेंदिवस वाढत असलेला कोरोना आवाक्यात आणण्यासाठी आपापल्या परीने
प्रत्येकाने घरी राहणे आवश्यक आहे. सुदैवाने या परिसरात अद्यापि कोरोनाचे रुग्ण आढळून आले नसले, तरी एकंदरीत परिस्थिती पाहता काळजी घेणे महत्त्वाचे आहे. यामुळे येथील ग्रामस्थांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
पाषाण, सुतारवाडी, सुसरोड परिसरात नागरिक अत्यावशक सेवेच्या वस्तू आणायच्या नावाखाली
लोक सारखेच घराबाहेर पडत आहेत व लॉकडाऊनचे पालन होताना दिसत नाही. संसर्गात वाढ होऊ शकते म्हणूनच, खबरदारीचा उपाय म्हणून आपण सोशल डिस्टन्सचा वापर करीत केवळ रोज सकाळी ७ ते १२ पर्यंतच आपले दुकान चालू ठेवावे.
ज्यामुळे आपल्याला या गंभीर परिस्थितीला सामोरे जाण्यास मदत होईल व लॉकडाऊनचा उद्देशदेखील साध्य होण्यास मदत होईल. अशा सूचना सर्वांना ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आल्या आहेत. या आवाहनाला परिसरातील व्यावसायिकांनी देखील चांगला प्रतिसाद देत आपली सर्व दुकाने दुपारनंतर बंद ठेवत आहेत.