२ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
पुणे : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करून विनापरवाना दारूची वाहतूक करताना वाठार पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे. वाठार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहिगाव (ता. कोरेगाव) येथील अविनाश बाळासाहेब चव्हाण विनोद सूर्यकांत चव्हाण यांनी जमावबंदी व मद्यविक्रीस बंदी असताना दारू विक्री करत असल्याचे दिसून आले.
बुधवारी रात्री ९ वाजता मारुती अल्टो (एम एच ०५ बी एस ३०९३) या कारमधून देशी दारूची विनापरवाना विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना दहिगाव येथे वाठार पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यांना दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.