मुंबई- धारावी, कोळीवाड्यानंतर आता पवई झोपडपट्टीत कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पवई झोपडपट्टीत राहणाऱ्या 35 वर्षांच्या तरुणाच्या ‘कोरोना’ चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून संपूर्ण झोपडपट्टीच सील करण्यात आली आहे.
कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर पवई झोपडपट्टीतील संचारबंदी अधिक कठोर करण्यात आली आहे.इथे संचार करण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. पंचशीलनगरमध्ये क्वारंटाईन झोन करण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबईच्या वरळी कोळीवाड्यातील कोळी समाजाच्या नेत्याचा काल कोरोनामुळे बळी गेला, तर धारावीत एका डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईकरांनी जास्त काळजी घेण्याची गरज आहे.