मुंबई – भारतीय जनतेने प्रेम दिले, प्रतिष्ठा दिली, ओळख दिली, स्थैर्य दिले, पण श्रद्धा दुबईकरांच्या पायाशी. हेच महान कार्य केले आहे बॉलिवूडचा बादशहा प्रसिद्ध अभिनेता व कोलकाता नाइट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खान याने. त्याच्या याच वर्तनावर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल केले आहे.
आजच्या घडीला भारतात दरदिवशी करोनाचे रुग्ण सापडत आहेत. त्यात देशाच्या अनेक मोठ्या व्यक्तींनी तसेच सेलिब्रिटींनी जनतेला काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. अभिनेता अक्षय कुमारने 25 कोटींची मदत केली आहे. तसेच अनेक खेळाडू, अभिनेते यांच्यासह समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा व मुकेश अंबानी यांनीही भरघोस मदत केली आहे.
मात्र, भारतीयांची नव्हे तर दुबईकरांची काळजी घेत शाहरुखने आपल्या टीकाकारांना चांगलेच कोलित दिले आहे. दुबई मीडिया या ट्विटरवर शाहरुखचा एक व्डिडीओ व्हायरल झाला असून त्यात शाहरुख दुबईकरांना करोनापासून काळजी घेण्याचे आवाहन करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
Message from Bollywood star Shah Rukh Khan to the Indian expat community in #Dubai: Stay in your homes, stay healthy and protect society. #StayHome @iamsrk @dubaitourism pic.twitter.com/ebUsik1aUw
— Dubai Media Office (@DXBMediaOffice) March 27, 2020
चीनकडून जगभरात पसरलेल्या करोना विषाणूंचा अनेकांना फटका बसला आहे. आतापर्यंत जवळपास 30 हजार लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. इतकेच नाही तर 6 लाख लोक करोनाचे रुग्ण असल्याचेही समोर आले आहे.