मुंबई – देशासमोर उभ्या असलेल्या कोरोनाशी लढा देण्यासाठी सरकारला मदत म्हणून उद्योजक पुढे सरसावले आहेत, तर याचबरोबरीने मास्टर ब्लास्टर ‘सचिन तेंडुलकर’ने सुद्धा मदतीचा हात पुढे केला आहे.
सचिनने कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकराला प्रत्येकी 25 लाखांची मदत केली आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्राने असे वृत्त प्रसिद्ध केले आहे. तसेच, तेंडुलकरला याबाबतची कोठेही चर्चा करायची नसल्याचा दावाही या वृत्तपत्रानं केला आहे.
दरम्यान, तेंडुलकरने केलेल्या 50 लाखांपैकी 25 लाख हे राज्य सरकारच्या मुख्यमंत्री मदत निधीत, तर 25 लाख हे पंतप्रधान मदत निधीत दिले जाणार आहेत. तेंडुलकरच्या जवळच्या व्यक्तीनं सांगितलं की,” ही मदत केल्याचं सचिनला कोणालाही सांगायचं नव्हतं. असं ते म्हणाले.
Sachin Tendulkar donated Rs 50 lakh to fight the #COVID19 pandemic. Sachin contribute Rs 25 lakh each to Prime Minister’s Relief Fund & Chief Minister’s Relief Fund. #coronavirus
— Rajesh Khilare (@Cricrajeshpk) March 27, 2020
याआधी महेंद्रसिंग धोनी, टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली, इरफान व युसूफ पठाण, शिखर धवन यांनीही कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी सरकारला मदत केली आहे.
1. Ganguly donate rice worth 50 lakh rupees
2. Tendulkar donated Rs 50 lakh (In PM & CM Fund)
3. Dhoni donated Rs 1 lakh to support 100 families for 14 days in Pune
4. Laxmi Shukla donating his 3 months’ MLA salary along with BCCI pension for same period #COVID19
— Rajesh Khilare (@Cricrajeshpk) March 27, 2020