पणजी- परिस्थिती आटोक्यात येतपर्यंत गोव्यात पर्यटकांनी यावं अशी ईच्छा नाही. असं मत गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी व्यक्त केलं आहे. आम्ही कोरोनाव्हायरस वर एक सेल्फ-असेसमेंट इंटरएक्टिव अॅप सुरू केले आहे. हे देशातील पहिले आहे. आम्ही सर्व पातळीवर सावधगिरी बाळगत आहोत, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, दरवर्षी गोव्यात अनेक देशातून लोक पर्यटनासाठी येतात. त्यामुळे त्याठिकाणी अनेक विदेशी पर्यटक बघायला मिळतात. त्यामुळे गोव्यात जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे.