मुंबई : कोरोना व्हायरसने जगभरातील 177 देशांमध्ये थैमान घातले आहे. गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाचे 30 हजारावर नवे रुग्ण आढळले आहेत. त्यात 1354 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. धक्कादायतक बाब म्हणजे एकट्या इटलीत गेल्या 24 तासात तब्बल 627 जणांचा बळी गेला आहे.
इटलीत 2 मार्चला 52 मृत होते, गेल्या 19 दिवसात इटलीमध्ये 3950 जणांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्येही मृत्यांचा आकडा एक हजारहून अधिक झाला आहे. गेल्या 24 तासात स्पेनमध्ये 262 जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 13 दिवसात 1063 जणांचा मृत्यू झाला आहे.
जगभरातील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा साधारण पावणे तीन लाखांवर गेला आहे. तर 11 हजार 385 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोनावर मात करुन 92 हजार रुग्ण बरेही झाले आहेत. तर सात हजारांहून अधिक रुग्णांची स्थिती अद्याप गंभीर आहे.