काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा देत भाजप प्रवेश केल्यानंतर मध्य प्रदेशात मोठा राजकीय पेचप्रसंग निर्माण झाला होता. शिंदे समर्थक आमदारांनी राजीनामा दिल्याने राज्यात काठावरील बहुमतावर सत्तेत असलेले कमल नाथ सरकार अडचणीत आले होते. याचीच परिणिती आज मुख्यमंत्री कमल नाथ यांच्या राजीनाम्यामध्ये झाली.
आज मध्यप्रदेश विधानसभेमध्ये कमल नाथ सरकारला संख्याबळ सिद्ध करायचे होते मात्र त्याआधीच त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. कमलनाथ यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व ज्येष्ठ भाजप नेते शिवराज सिंग चौहान यांनी कमल नाथ यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीबाबतचा तपशील अद्याप समजू शकला नाही.
Bhopal: BJP leader Shivraj Singh Chouhan leaves after meeting Congress’ Kamal Nath, at the latter’s residence. Kamal Nath has resigned as Madhya Pradesh Chief Minister, ahead of the floor test which was to take place at the state Assembly today. pic.twitter.com/UN2eW1J168
— ANI (@ANI) March 20, 2020