नवी दिल्ली – ऑलिम्पिक स्पर्धा जपानमध्ये होत आहे आणि ही स्पर्धा रद्द करा किंवा पुढे ढकला अशी मागणी होत असली तरी स्पर्धा ठरल्यानुसार होणारच, अशी ग्वाही खुद्द जपानचे पंतप्रधान देत असले तरी त्यांच्या वक्तव्याला धक्का बसला आहे. ऑलिम्पिक समितीचे उपप्रमुख कोजो ताशिमा यांनाच करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही स्पर्धा घेण्याचा अट्टहास कशासाठी, असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
ताशिमा यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली होती व त्यात ते पॉझिटिव्ह ठरले आहेत. समितीच्या उपप्रमुखालाच करोनाची लागण होऊ शकते तर स्पर्धेचे भवित्वय काय असेल, अशीही विचारणा देशवासी करत आहेत.