सहाय्यक पायलट म्हणून प्रिया तेटगुरे यांची नियुक्ती
मुंबई : 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरी केला जात असतानाच कोकण रेल्वेने महिलांसाठी एक गुडन्यूज दिली आहे. कोकण रेल्वेची पहिली महिला सारथी म्हणून शिल्पा माने (रत्नागिरी), तर दुसऱ्या शामला नागे (श्रीवर्धन) आता तिसऱ्या प्रिया तेटगुरे यांची नेमणूक झाली आहे.
प्रिया या आता यापुढे कोकण रेल्वेच्या सहाय्यक पायलट म्हणून महिला असणार आहे. सह्याद्रीच्या कडेकपारीतून आणि निसर्गाच्या सानिध्यातून धावणारी कोकण रेल्वे. मोठ-मोठे पुल आणि बोगदे यातून मार्ग काढत जाणारी रेल्वे.
अशा आव्हानांचा सामना करत कोकण रेल्वे चालविणे एक आव्हान असते. हे आव्हान पेलत कोकण रेल्वे चालविण्याचा पहिला मान हा शिल्पा माने यांच्या माध्यमातून महिलांना मिळाला आहे.
महिला सक्षमीकरणाच्या एका नव्या अध्यायच्या पटकथेची सुरुवात कोकण रेल्वेत आंतराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला होत आहे.
आणखी एक महिला प्रिया तेटगुरे यांच्या निमित्ताने कोकण रेल्वेत सहाय्यक पायलट असणार आहे. ही महिलांसाठी गौरवशाली बाब ठरली आहे.