महिलेस गंडा
हडपसर येथील 42 वर्षीय महिलेचीही याच पद्धतीने फसवणूक झाली. तिने वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. महिलेस ऍप डाऊनलोड करण्यास सांगून त्यांच्या बॅंक खात्यातील 60 हजार रुपये काढून घेतले.
पुणे – पेटीएम अद्ययावत करण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकारास प्रतिसाद देऊ नका, असे सायबर पोलिसांकडून वारंवार सांगितल्यानंतही पेटीएम केवायसीला बळी पडत आहे. पेटीएम अद्ययावत करून देण्याच्या नावाखाली एका वृद्धासह दोघांना तब्बल 1 लाख 35 हजार रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे.
पेटीएम अद्ययावत करण्यासाठी केवायसीचा बहाणा करून अनोळखी व्यक्ती महिला, वृद्ध नागररिकांना फोन, मेसेज व लिंक पाठवून त्यांची आर्थिक फसवणूक करीत आहे. मागील दीड महिन्यात 158 जणांची 18 लाखांची फसवणूक झाली आहे.
प्रभात रस्त्यावर रहाणाऱ्या 75 वर्षीय नागरिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 23 डिसेंबर 2019 रोजी फिर्यादीच्या मोबाइलवर अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला.
त्यावर पेटीएम केवायसी अद्ययावत करण्याचा उल्लेख केला होता. त्यानुसार फिर्यादीने संबंधित मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर संबंधित व्यक्तीने फिर्यादी यांना “क्विक सपोर्ट’ हे ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. ते ऍप डाऊनलोड केल्यानंतर त्याने फिर्यादीस 10 रुपये त्याद्वारे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर ज्या क्रेडीट कार्डद्वारे पैसे भरले, त्याचे दोन्ही बाजुंनी फोटो काढून ते पाठविण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळातच फिर्यादीच्या खात्यातील 75 हजार रुपये अनोळखी व्यक्तींनी काढून घेतले.