मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्या दौर्यावर जाणार आहेत.
मुख्यमंत्रीपदाचे शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्ताने मुख्यमंत्री अयोध्या दौर्यावर जाणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
7 मार्चला उद्धव ठाकरे दुपारी भगवान राम यांचे दर्शन घेऊन सरयू नदीवर आरती करणार आहेत.”चला 7 मार्च ऐतिहासिक बनवूया. सर्वजण अयोध्येत जाऊया. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी सहभागी व्हावे”, असे अवाहन संजय राऊत यांनी केले आहे.
शुक्रवारी नवी दिल्लीत ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीसह भाजपच्या इतर नेत्यांबरोबर भेट घेतल्याच्या एक दिवसानंतर ही घोषणा करण्यात आली. नोव्हेंबर 2018 मध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजपबरोबर महाराष्ट्रत आणि केंद्रात सत्तेत असताना अयोध्याचा पहिला दौरा केला होता. तसेच गेल्या वर्षी त्यांनी अयोध्या प्रकरणातील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागत केले होते.