कृष्णा – कोयना प्रीतिसंगमावर 17 व्या शतकातील शिवापूर व सध्याचे सैदापूर (ता. कराड) येथील शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणजे पावकेश्वर मंदिर. या मंदिराचे बांधकाम साधारण 13 व्या शतकातील आहे. मंदिरावर अनेक दुर्मिळ शिल्पकलेने बांधणी केलेले आहे. हेमाडपंथीय महादेव मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.
महाशिवरात्री दिवशी या मंदिरात धार्मिक कार्यक्रम होतात. काही भाविक दर सोमवारी पिंडीला मंत्रोच्चारात अभिषेक घालतात. या हेमाडपंथीय मंदिराचे बांधकाम घडीव दगडात आहे. त्यावर सुबक नक्षी कोरलेली आहे. बऱ्याच वर्षांनंतर पावकेश्वर मंदिराच्या मूळ स्वरूपातील अवशेष त्याच्या पौराणिकतेची साक्ष देत आहेत.
कराड शहराच्या उत्तरेस 3 किलोमीटर सैदापूर गावात हे मंदिर आहे. राष्ट्रीय महामार्गावरून मंदिराकडे येण्यासाठी मसूर मार्गे सैदापूर तसेच कराडहून विट्याच्या दिशेने ओगलेवाडीमार्गे सैदापूर असे मार्ग आहेत.