पन्नास मॅट्रिक टन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याचे उद्घाटन
लोणी धामणी- लोणी (ता. आंबेगाव) येथे उपबाजार समिती येथे पन्नास मॅट्रिक टन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचरचे सभापती देवदत निकम यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपसभापती संजय शेळके, संचालक दत्तात्रय वावरे, बाळासाहेब मेंगडे, बाळासाहेब बानखिले, संचालिका जायदाबी मुजावर, माजी संचालक आर. आर. वाळुंज, सरपंच ऊर्मिला धुमाळ, उपसरपंच राणी गायकवाड, शरद बॅंकेचे संचालक अशोक आदक पाटील, माजी सरपंच उध्दव लंके, भगवान सिनलकर, महेंद्र वाळुंज, बाळशिराम वाळुंज, मच्छिंद्र वाळुंज, बाळासाहेब कोचर, सतीश थोरात, मनोज तांबे, नंदुभाई मुजावर, मच्छिंद्र वाघ, सचिन बोऱ्हाडे, लोणीचे कार्यालयीन प्रमुख गणेश गावडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
- लोणी येथील उपबाजार समितीमध्ये लवकरच खुल्या मोकळ्याकांदा खरेदी-विक्रीचे व्यवहार सुरू केले जाणार आहेत,त्यामुळे या परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची या काट्यामुळे चांगली सोय होणार आहे.
देवदत्त निकम, सभापती