माओवादी संघटनेच्या दोन नेत्यांची संप्पती जप्त

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पटना विभागाने माओवादी संघटना भाकपच्या दोन नेत्यांची सुमारे 26 लाख रुपयांची जंगम  मालमत्ता जप्त केली आहे.

‘ईडीने’ दिलेल्या माहितीनुसार, ईडीच्या पथकाने गुरुवारी सकाळी भाकपचे अभिजित यादव उर्फ ​​महावीर यादव यांची 16.49 लाख रुपयांची जंगम मालमत्ता जप्त केली.

जप्त केलेल्या संपत्तीमध्ये झारखंडच्या पलामू जिल्ह्यात पत्नी गीता देवीच्या नावावर मिळवलेल्या 16,04,745 रुपये किंमतीचे 6 भूखंड आहेत. तसेच गीता देवीच्या बँक खात्यात 44,867 रुपये गोठवण्यात आले आहे. अंमलबजावणी संचालनालयाने पीएमएलए अंतर्गत फरार अभिजीत यादव यांच्या विरूद्ध ही कारवाई केली. अभिजित यादव यांच्यावर 55 फौजदारी गुन्हे दाखल आहेत.

ईडीच्या आणखी एका पथकाने बुधवारी संध्याकाळी सीपीआय माओवादी संघटनेचे सदस्य पिंटू राणा उर्फ ​​राजेश राणा, यांच्या नावावर असणारी 67 लाख रुपयांपेक्षा अधिक किंमतीची संपत्ती जप्त केली आहे.

दरम्यान ईडीच्या पटना युनिटने 2018 आणि 2019  या वर्षात नक्षलवादी नेते संदीप यादव, प्रदुमन शर्मा, मुसाफिर सहनी, विनय यादव आणि विनोदकुमार गंजू यांची जवळपास 74.74 कोटीची मालमत्ता जप्त केली आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.