मुंबई : ‘व्हॅलेंटाइन डे’ हा दिवस प्रेमवीरांसाठी खास असतो, या दिवसाचे महत्व अनेक जण त्यांच्या मनाप्रमाणे साजरा करतात. भारताचा महान क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील आपले पहिले प्रेम उघड केले आहे. अर्थात सचिनचे पहिले प्रेम हे क्रिकेटच आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
१४ फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाइन डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपल्या आयुष्यातील सर्वात प्रिय व्यक्तीला आपण गुलाबाचे फूल, भेटवस्तू तसेच चाॅकलेट्स देऊन आपले प्रेम व्यक्त करतो. आता सोशल मिडियाच्या हवेत हॅशटॅग , फेसबुक आणि ट्विटरव्दारेही आपले प्रेम व्यक्त केले जाते. त्यात सचिननेही प्रथमच व्हॅलेंटाइन डे निमित्त पहिल्या प्रेमाची वाच्यता केली.
My First Love! 😀 pic.twitter.com/KsYEYyLaxD
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 14, 2020
सचिनने ट्विटर संदेशात स्माईली आणि त्याखाली कॅप्शन पोस्ट करत आपला नेटमध्ये फलंदाजी करतानाचा फोटो देखील पोस्ट केला आहे. तसेच एक व्हिडीओ देखील पोस्ट केला असून त्यात सचिन त्याचा सर्वात आवडता शाॅट स्ट्रेट ड्राइव्हचा फटका खेळताना दिसतो.