संग्रूर (पंजाब) : मुलांना शाळेतून घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतल्याने चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या व्हॅनमध्ये 12 मुले होती. शेजारील शेतांत काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी आठ मुले पेटत्या गाडीतून बाहेर काढल्याने सुदैवाने बचावली.
व्हॅनने पेट घेण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. अपघातग्रस्त मुले शाळेतून घरी परतत होती. ही सर्व मुले 10 ते 12 वयोगटातील होती. दरम्यान पोलिस घटनास्थळावर तातडीने दाखल झाले आहेत. त्यांनी आगीचे कारण शोधण्याचा तपास सुरू केला आहे.
या धक्कादायक घटनेबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी शोक व्यक्त केला आहे. यात दोषी असणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्यात येईल,असे त्यांनी म्हटले आहे. संग्रूर येथून आतिशय दुख:द बातमी आली आहे. तेथे स्कूल व्हॅनने पेट घेतल्याने चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस अधिक्षक घटनास्थळावर दाखल झाले आहेत. या घटनेची न्यायदंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत. दोषींना कठोर शासन केले जाईल, असे ट्विट त्यांनी केले आहे.
( आणखी तपशील अपेक्षित)