लाॅसेन : भारतीय पुरूष हाॅकी संघाचा मध्यरक्षक ‘विवेक सागर प्रसाद’ हा आंतरराष्ट्रीय हाॅकी फेडरेशनचा (FIH) २०१९ चा रायझिंग स्टार पुरस्काराचा मानकरी ठरला. १९ वर्षीय विवेक याने अर्जेंटिनाच्या मेइको कासेला (व्दितीय) तर आॅस्ट्रेलियाच्या ब्लेक गोवर्सला (तृतीय) मागे टाकत पुरस्कार पटकावला.
Kudos to the FIH Rising Star of the Year 2019 (M) – Vivek Sagar. We congratulate the young-gun on his victory! 🙌#IndiaKaGame pic.twitter.com/yRp08zPPyx
— Hockey India (@TheHockeyIndia) February 10, 2020
विवेकला एकूण ३४.५ टक्के मते मिळाली, तर मेइको याला २२ टक्के आणि गोवर्स याला एकूण २०.९ टक्के मते मिळाली.
Vivek Sagar naam hai… FIH Rising Star of the Year 2019 banna kaam hai! 😎
Congratulations on achieving this feat. 🙌
P.S: Watch the video till the end! 😂#IndiaKaGame @sports_odisha @CMO_Odisha @Media_SAI @IndiaSports pic.twitter.com/wOM5Qia5j1
— Hockey India (@TheHockeyIndia) February 10, 2020
दरम्यान, विवेकने जानेवारी २०१८ मध्ये वयाच्या १७ व्या वर्षीच राष्ट्रीय संघात पदार्पण केले होते. त्यावेळी तो भारताचा दुसरा सर्वांत युवा हाॅकीपटू ठरला होता. त्यानंतर त्याने भारतीय संघाकडून ५० पेक्षा अधिक सामने खेळले आहेत. २०१९ साली सुल्तान अलजान शाह चषकमध्ये भारतीय संघाने रौप्यपदक पटकावले होते, त्यावेळी विवेक देखील संघाचा प्रतिनिधी होता.