पुणे : चेक प्रजासत्ताकच्या यिरी व्हेसलू याने रविवारी महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेतील एकेरीचे विजेतेपद पटकावले. विजेतेपदासाठीच्या लढतीत यिरी व्हेसलीने बेलारूसच्या इगोर गेरासिमोव याचा ७-६(२), ५-७, ६-३ असा पराभव केला. ही लढत २ तास १२ मिनिट चालली.
A flawless Jiri Vesely put up a smashing performance to become SINGLES CHAMPION at #TOM2020! 🏆 🇨🇿
Tough luck for Egor Gerasimov! 💪🏼#AdvantagePune #ATPTour #TataOpenMaharashtra | @jiri_vesely | @atptour pic.twitter.com/PTPJeGKt6u
— Tata Open Maharashtra (@MaharashtraOpen) February 9, 2020
जागतिक क्रमवारीत २७ वर्षीय इगोर ९० व्या, तर २६ वर्षीय व्हेसली १०७ व्या क्रमाकांवर आहे. व्हेसलीने पाच वर्षानंतर ‘एटीपी वर्ल्ड टूर २५० सीरिज’मध्ये एकरीचे विजेतेपद पटकावले. यापूर्वी त्याने २०१५ मध्ये आॅकलंड ओपन स्पर्धा जिंकली होती.
🏆 CHAMPIONSHIP POINT!#AdvantagePune #TOM2020 #ATPTour #TataOpenMaharashtra @jiri_vesely pic.twitter.com/zbAVL9aBsn
— Tata Open Maharashtra (@MaharashtraOpen) February 9, 2020
दरम्यान, पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीत व्हेसलीने लिथुआनियाच्या रिचर्डस बरांकिसवर ६-७(८), ७-६(३), ७-६(७) असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता तर दुस-या उपांत्य लढतीत बेलारूसच्या इगोर गेरासिमोवने आॅस्ट्रेलियाच्या जेम्स डकवर्थचा ७-६(२), ६-४ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.