बंगळुरू : नवरदेवाला लग्न समारंभात नवरीच्या साडी आवडली नसल्यामुळे चक्क लग्न मोडल्याचे प्रकरण समोर आले आहे. कर्नाटकमधील हासन जिल्ह्यात हि घटना घडली आहे. नवरदेव लग्नाच्या एक दिवस आगोदरच फरार झाला असून, नवरीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
आई-वडिलांच्या सांगण्यानुसार नवदेवाने लग्न मोडल्याचा आरोप मुलीकडील नातेवाईकांनी केला आहे. रघुकुमार असे नावरदेवाचं नाव असून त्यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रघुकुमारच्या आई-वडिलांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
विशेष म्हणजे या दोघांचेही एकमेकांवर आगोदरच प्रेम होते. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कुटुंबाने देखील त्यांच्या लग्नाला पाठींबा दिला होता.
दरम्यान काही विधी पडत असताना वर पित्याला वधूची साडी आवडली नाही. त्यांनी नवरीला साडी बदलण्यास सांगितले होते. या वरून दोन्ही कुटुंबात वाद झाला होता.