मुंबई : राज्यपाल भगतशिंग कोशारी यांनी आज करवीर निवासिनी अंबाबाई-महालक्ष्मीचे दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील जिल्हाधिकारी दौलत देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव उपस्थित होते.
आज शिवाजी विद्यापीठाचा 56 वा दीक्षांत समारंभ राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी विद्यापीठाच्या लोककला केंद्रात संपन्न झाला. त्यानिमित्त ते कोल्हापुरात आले होते. यावेळी 60 हजार 167 स्नातकांना राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी इच्छाशक्ती आणि दृढ संकल्प जोपासून आपले ध्येय साध्य करावे, असे आवाहनही राज्यपालांनी मार्गदर्शन करताना केले.