शहाजहानपूर : अलाहाबाद उच्च न्यायालयाने आज भाजप नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद यांना बलात्कार प्रकरणामध्ये जामीन मंजूर केला आहे. स्वामी चिन्मयानंद यांच्यावर त्यांच्याच संस्थेमार्फत चालविल्या जाणाऱ्या विधी महाविद्यालयातील एका विद्यार्थीनेवर बलात्कार केल्याचा आरोप असून गतवर्षी याबाबतचे कथित व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली होती.
अलाहाबाद उच्च न्यायालयाने स्वामी चिन्मयानंद यांचा जामीन मंजूर केल्याने चिन्मयानंद यांच्यासाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे. तत्पूर्वी, स्वामी चिन्मयानंद यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या २३ वर्षीय विद्यार्थिनीला स्वामी चिन्मयानंद यांच्याकडे ५ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. न्यायालयाने विद्यार्थिनीला खंडणी प्रकरणामध्ये ११ डिसेंबर रोजी जमीन मंजूर केला होता.