मुंबई : येत्या 24 तासांत विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात पावसाच्या हलक्या सरी तर काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळण्याची शक्यता आहे.
राज्यातील नागपूर, नाशिक, गडचिरोली, यवतमाळ, बीड आणि नांदेड या जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या उत्तर भागात, येत्या 24 तास तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ, अरुणाचल प्रदेश आणि आसाममधील काही ठिकाणी येत्या 24 तासांत वादळी वादळासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.