अंगद बेदी सध्या एकता कपूरच्या प्रॉडक्शनखाली तयार होत असलेल्या “ममभाई” या वेबसिरीजमध्ये काम करतो आहे. त्याला मुंबई पोलीस अधिकाऱ्याचा रोल करायचा आहे.
आपल्या रोलसाठी त्याने मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांबरोबर बसून चर्चा केली व रोलची तयारी केली.
अंगदने या अधिकाऱ्यांचा अनुभव जाणून घेतला. यापैकी काही अधिकाऱ्यांनी जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य निभावले आहे.
View this post on Instagram
BHASKAR SHETTY!!! @mumbhaiofficial @ektaravikapoor ? by the wifey @nehadhupia #mumbhai
तर काहींनी अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये संयमाने कामगिरी चोख बजावली आहे. या अनुभवी सिनिअर अधिकाऱ्यांनी अंगदला बहुमोल मार्गदर्शन केले. तर काहींनी त्याला काही मोलाच्य टीप्स दिल्या. त्यामुळे अंगदला भास्कर शेट्टी या आपल्या या व्यक्तिरेखेला साकारण्यास बरीच मदत झाली. या अधिकाऱ्यांच्या उर्जेमुळे अंगद खूपच प्रभावित झाला आहे.
View this post on Instagram
Some working stills from @insideedgeamazon season 2. #arvindvashishthh shot by @mayank0491 ?
हे अधिकारी ज्या पद्धतीने काम करायचे, हे पाहून आपण अगदी स्तिमित झालो असल्याचे त्याने सांगितले. जितका जास्ती वेळ आपण या अधिकाऱ्यांच्या संगतीमध्ये घालवला तितकेच आपल्याला आपला रोल साकारण्यासाठी महत्वाचे मार्गदर्शन मिळाले, असे अंगदने सांगितले. या अनुभवाचा फायदा तो कसा करतो, ते वेबसिरीजमध्ये दिसेलच.