पिंपरी – दुकान भाड्याने देण्याच्या कारणावरून तिघांनी एका वृद्ध नागरिकाला मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 27) दुपारी कासारवाडी येथे घडली.
रमणलाल रामचंद्र शिंगवी (वय 71, रा. इंद्रायणी नगर, भोसरी) असे जखमी वृद्धाचे नाव असून त्यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भगवान खंडू चव्हाण (वय 75), रुपेश चव्हाण, भगवान चव्हाण यांची नात सुप्रिया (सर्व रा. कासारवाडी) अशी मारहाण करणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी यांना त्यांचे दुकान भाड्याने देण्याच्या कारणावरून तसेच एग्रीमेंटच्या कारणावरून शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी भगवान याने शिंगवी यांना वजनदार वस्तूने मारून जखमी केले.