मुंबई : सोमवारी शेअर बाजाराच्या मोठी घसरण झाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (बीएसई) सेन्सेक्स 458 अंकांनी घसरून 41155.12 वर बंद झाला. त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई) देखील 129.25 अंकांनी घसरून 12119.00 अंकांवर बंद झाला.
सेन्सेक्स बँकिंग, ऑटो, मेटल, पीएसयू क्षेत्रातील समभाग घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात पहिल्या तीन दिवस शेअर बाजार घसरण दिसून आली तर शेवटच्या दोन दिवसांत शेअर बाजारात वाढ नोंदली गेली.
बीएसईचा 30 समभागांचा निर्देशांक 0.79 टक्क्यांनी घसरुन 41,613.19 वर बंद झाला. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी 0.84 टक्क्यांनी घसरून 12,248.25 अंकांवर बंद झाला.संसदेत अर्थसंकल्पाचे सादरीकरण लक्षात घेता पुढील आठवड्यात 01 फेब्रुवारी रोजी शेअर बाजार चालू राहणार आहे.