औरंगाबाद – मराठवाड्यातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी भाजपच्या माजी नेत्या पंकजा मुंडे आज लाक्षणिक उपोषण करणार आहेत. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पंकजा मुंडे या लाक्षणिक उपोषण करणार असून मराठवाड्याच्या पाणी प्रश्नाकडे महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधणार आहेत.
पंकजा मुंडे यांच्यासह देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सहभागी होणार आहेत. दरम्यान, याआधी हे आंदोलन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्यावतीने होणार होते.
एक दिवस आपल्या विभागासाठी.आपल्या भविष्यासाठी..@Dev_Fadnavis
@raosahebdanve
@ChDadaPatil
@BJP4Maharashtra @OfficeofUT @CMOMaharashtra pic.twitter.com/WrqQwHZ1Mx— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 23, 2020
मराठवाड्यात पाण्याची वण वण संपवून समृद्धी ची सत्ता स्थापना व्हावी यासाठी माझं उपोषण एक लक्षवेधी प्रयास आहे!! उपोषण आक्षेपासाठी नाही ही अपेक्षांसाठी आहे ..मागचे 5 वर्ष प्रयत्न झाले पुढे ही व्हावे आणि होतील ही रास्त अपेक्षा आहे ..आपण ही साथ दयावी ????
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) January 26, 2020