कॉंग्रेसने पाठवलेल्या पार्सलसाठी पंतप्रधानांना द्यावे लागणार पैसे

नवी दिल्ली : देशभरात काल 71 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कॉंग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऍमेझॉनवरून एक भेट पाठवली आहे. सध्या सोशलमीडियावर या भेटीची चर्चा जोरात सुरू आहे. आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरात सुरु असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने संविधानाची प्रत भेट म्हणून पाठवली आहे. नवी दिल्लीतील केंद्रीय सचिवालयाच्या पत्त्यावर ऍमेझॉनवरून संविधानाची प्रत कॉंग्रेसने भेट म्हणून पाठवली आहे. या प्रतची किंमत 170 रूपये आहे. तर ही प्रत पे ऑन डिलिव्हरीच्या माध्यमातून पाठवल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही रक्कम भरावी लागणार आहे.


कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटरवर याबाबत ट्विट करून याविषयीची माहिती देण्यात आली आहे. संविधानाची प्रत पाठवत कॉंग्रेसने मोदींवर टीका केली आहे. ट्विटमध्ये कॉंग्रेसने म्हटलेय की, प्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्हाला भारतीय संविधानाची एक प्रत पाठवली असून लवकरच तुम्हाला मिळेल. देशात फूट पाडण्याच्या कामातून तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की वाचा. कॉंग्रेसने आपल्या ट्विटरवर मोदींना संविधानाची प्रत पाठवल्याचा ऍमेझॉनवरील स्नॅपशॉट पोस्ट केला आहे.


कॉंग्रेसने आणखी एका ट्विटमध्ये भाजपावर टीका केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, संविधानाच्या अनुच्छेद 14 नुसार देशातील नागरिकांना समानतेचा अधिकार आहे. हे भाजपाला अद्याप समजेले नाही.


कॉंग्रेसने एकापाठोपाठ चार ट्विट केले आहे. याट्विटमध्ये संविधानाच्या अनुच्छेद 15,19 नुसार भाजपावर हल्लाबोल केला आहे. कॉंग्रेसच्या या टीकेला भाजपा आता काय प्रत्युत्तर देणार याकडे नेटकऱ्यांचं लक्ष लागले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.