अंकारा (तुर्कस्तान) : तुर्कस्तानच्या पूर्व भागात झालेल्या रिश्टर स्केलवर 6.8 नोंदवलेल्या भूकंपात 18 जण मरण पावले. 500 जण जखमी झाले. सुमारे 30 जण कोसळलेल्या इमारतींच्या ढीगाऱ्या खाली अडकले आहेत.
भूकंपग्रस्त भागात नजिकच्या परगण्यातलि बचाव पथके पाठवण्यात आली आहेत. या भागात अंधरात फ्लडलाईटच्या प्रकाशात गोठवणाऱ्या थंडीत मदत कार्य सुरू आहेत. लष्करलाही मदत कार्यासाठी पाचारण करण्यात आले आहे, असे संरक्षण मंत्री हुलुसी अकार यांनी सांगितले.
शेकडो नागरिक या घटनेने बेघर झाले. गेझीन जिल्ह्यात ढिगाऱ्या खालून एका जखमी व्यक्तीस बाहर काढतानाचे दृष्य टीव्हीवर दाखवण्यात येत होते. इलिझीगमध्ये 13 जण मरण पावले आहेत. तर मलात्या येथे पाच जण मरण पावले.