शनिवारवाडयाचा उघडलेला ‘दिल्ली दरवाजा’ बघण्यासाठी पुणेकरांची गर्दी
पुणे – पुण्याचं वैभव असलेल्या शनिवारवाड्याचा आज (दि. २२) २८८वा वर्धापन दिन आहे. हे औचित्य साधत शनिवारवाड्याचा ‘दिल्ली दरवाजा’ खुला करण्यात आला. दोन तासांसाठी हा दरवाजा उघडण्यात येतो. एरवी दिल्ली दरवाजा बंद असतो.
त्यातील छोटा दरवाजा मधून नागरिकांना शनिवारवाड्यात प्रवेश दिला जातो. दरम्यान, हा भव्य दरवाजा उघडतानाचे दृश्य पाहण्यास मोठ्या संख्येने पुणेकरांनी आणि पर्यटकांनी गर्दी केली होती.