आलिया भट “गंगूबाई…”च्या सेटवर जखमी झाल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली होती. मात्र आलियाने ही अफवा फेटाळून लावली आहे. आपल्याबाबतचे स्पष्टीकरण तिने इन्स्टाग्रामवर दिले आहे. पूर्वीच जखमी झाल्याचा त्रास आपल्याला पुन्हा सतावायला लागला होता.
नव्याने आपल्याला कोणतीही इजा झालेली नाही, असे आलियाने म्हटले आहे. आपल्याबाबत कोणतीही बातमी खातरजमा न करता प्रसिद्ध करू नये, अशी तंबीदेखील तिने प्रसिद्धी माध्यमांना दिली आहे. काही दिवसांपूर्वी तिने स्वतःचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यामध्ये ती तिच्या आवडत्या मांजरीला घेऊन बेडवर पहुडलेली दिसत होती.
“माझ्या मम्मी बरोबरचा सेल्फी टाईम. तिच्या पाठीला दुखापत झाली आहे आणि रात्री 2 वाजता काहीही केले जाऊ शकत नाही.’ असे आलियाने कॅप्शनमध्ये म्हटले आहे. त्यामुळे आलियाच्या तब्येतीबाबत अफवा पसरायला लागल्या होत्या.
सध्या आलिया संजय लिला भन्साळीच्या “गंगूबाई काठियावाडी’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा 11 सप्टेंबर 2020 ला रिलीज होणार आहे.