शिंदे वासुली – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व चाकण शिक्षण मंडळाचे कला व वाणिज्य महाविद्यालय चाकण आणि नवसह्याद्री चॅरिटेबल ट्रस्टचे कला व वाणिज्य महाविद्यालय चाकण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “सक्षम युवा समर्थ भारत’ या उपक्रमांतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय श्रम संस्कार शिबिर चाकण एमआयडीसीतील वासुली येथे उत्साहात पार पडले.
शिबिराचे उद्घाटन पिंपरी-पाईट गटाचे जिल्हा परिषद सदस्य व गटनेते शरद बुट्टे पाटील यांच्या हस्ते झाले. तर शिबिराचा समारोप खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मोहिते पाटलांनी सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या.
शिबिराचे उद्घाटन व समारोप प्रसंगी आमदार दिलीप मोहिते पाटील, शरद बुट्टे पाटील, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष कैलास लिंभोरे, सरपंच इंदुबाई शेळके, उपसरपंच कांताबाई गावडे, माजी उपसरपंच सुरेश पिंगळे देशमुख, सचिन पाचपुते, पोलीस पाटील अमोल पाचपुते, ग्रामसेवक श्रीधर नाईकडे, गाव कामगार तलाठी दत्तात्रय केंगले, शिवसेना संपर्कप्रमुख अमोल पाचपुते, मोहन पाचपुते, चंद्रकांत कावरे, माजी विद्यार्थी अतुल पाचपुते, नवसह्याद्री ट्रस्टचे अध्यक्ष एन.डी.पिंगळे, प्राचार्य राजेश लाटणे, प्राचार्या डॉ शोभा इंगवले, विश्वस्त सचिव अविनाश अरगडे, प्रमुख विश्वस्त मोतीलाल सांकला, दोन्ही महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व वासुली ग्रामपंचायतीचे सदस्य व कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी वासुली गावात ग्राम स्वच्छता अभियान, कचरा व सांडपाणी व्यवस्थापन, शाळा व मंदिर स्वच्छता, धार्मिक स्थळे व स्थानिक इतिहास लेखन, जलसंवर्धन, जलस्त्रोत, श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर परिभ्रमण व परिसर स्वच्छता, ग्रामसर्व्हेक्षण आदि उपक्रम राबविण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.
विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, तंबाखू मुक्त अभियान, एड्स विषयी माहिती व जनजागृती करुन रॅली काढली होती. या काळात विद्यार्थ्यांनी केलेल्या इतिहास लेखन, प्रकल्प आणि विविध उपक्रमांची समाजोपयोगी माहिती अहवाल सरकारला सादर केला जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नीलकंठ गायकवाड यांनी, प्रास्ताविक प्रा. दत्तात्रय तांबे यांनी तर विद्यार्थी प्रतिनिधी तुषार राक्षेने आभार मानले.