चिंबळी – श्रीक्षेत्र आळंदी जवळ असलेल्या सोळू ते मरकळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाल्याने प्रवाशांसह स्थानिकांनी समाधान व्यक्त केले.
आळंदी ते लोणीकंद रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जडमालवाहू व इतर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने सोळू ते मरकळपर्यंत रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने दुचाकी चालकांना तारावेरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे प्रवशांसह स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते.
मात्र, गेल्या आठवड्यापासून सोळू ते मरकळ रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.