हावडा – पश्चिम बंगाल मधील हावडा जिल्ह्यात एका पुलाजवळ तृणमुल कॉंग्रेसचा स्थानिक नेता मृतावस्थेत सापडल्याने खळबळ माजली आहे. शेख असहदुल रहमान असे त्याचे नाव असून ते बैनाम ग्राम पंचायतीत तृणमुल कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. कोरिया बोरोपोल पुला नजिक त्यांचा मृतदेह आढळून आला असून त्यांच्या डोक्याला मार लागला असल्याचे लक्षात आल्याने हा घातपाताचा प्रकार असावा असा कयास व्यक्त केला जात आहे.
ते खेजुट्टी गावात इलेक्ट्रीकचे बिल भरण्यासाठी गेले होते असे त्यांच्या कुटंबियांनी सांगितले. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तृणमुल समर्थकांनी बैनान रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी दोषींवर त्वरीत कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.