बऱ्हामपुर – ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील एका जंगलात जंगली हत्तीने एका इसमाला तुडवून ठार मारल्याची घटना घडली आहे. अलु लच्छेया असे या इसमाचे नाव असून तो तेथून जवळच असलेल्या एका शेतात मजुर म्हणून काम करतो. तो कामावर जात असताना वाटेतील जंगलात हत्तींनी त्याला घेरून पायदळी तुडवून ठार केले. या प्रकरणात संबंधीत इसमाच्या पत्नीला सरकारी नियमाप्रमाणे नुकसानभरपाई दिली जाईल असे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.
या जंगलातील बारा हत्तींनी मानवी वस्तीतील आपला वावर वाढवला आहे. त्यातील एक हत्ती फारच बेभान झाला होता व त्याने अन्यत्रही धुमाकूळ घातला होता. त्याच्याच तावडीत हा इसम सापडला. या हत्तींनी शेतीचेही मोठे नुकसान अलिकडच्या काळात केल्याने त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे. पण हा जंगली हत्तींचा कळप अजून वनखात्याच्या नियंत्रणात आलेला नाही.