ब्लूफाँटेन : भारतीय संघाने १९ वर्षाखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ‘अ’ गटात सलामीच्या लढतीत श्रीलंकेवर ९० धावांनी दणदणीत विजय मिळवत आपल्या ‘मिशन वर्ल्ड कप’ ला थाटात सुरूवात केली. त्यानंतर आज भारतीय संघाची विश्वचषक स्पर्धेत जपानविरूध्द लढत होत आहे.
थोड्याच वेळात भारत-जपान हा सामना सुरू होणार असून तत्पूर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा भारताने जिंकला आहे. कर्णधार प्रियम गर्ग याने क्षेत्ररक्षण स्विकारताना जपान संघास प्रथम फलंदाजीस पाचारण केलं आहे.
And in Bloemfontein India captain Priyam Garg has won the toss and elected to bowl first.#U19CWC | #INDvJPN | #FutureStars pic.twitter.com/evJlvd4y5q
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 21, 2020
दरम्यान, जपान संघाची ही पदार्पणाची लढत स्पर्धा आहे. त्याच्या संघाकडे भारतीय संघाच्या तुलनेने कमी अनुभव असणार आहे. त्यामुळे ही लढत जिंकून भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित करता येईल.
In Potchefstroom Scotland have won the toss and will bat first against Bangladesh 🏏 #U19CWC | #BANvSCO | #FutureStars pic.twitter.com/u37WwpJf33
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 21, 2020
दुसरीकडे ‘क’ गटात स्काॅटलंड वि बांगलादेश ही लढत होणार आहे. स्काॅटलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.